Homeमहत्त्वाचेगोल्डन रोटरी ट्रस्टच्या अध्यक्षपदी किरण ओसवाल तर सचिव पदी राकेश गरुड यांची...

गोल्डन रोटरी ट्रस्टच्या अध्यक्षपदी किरण ओसवाल तर सचिव पदी राकेश गरुड यांची निवड

गोल्डन रोटरी ट्रस्टच्या अध्यक्षपदी किरण ओसवाल तर सचिव पदी राकेश गरुड यांची निवड

तळेगाव दाभाडे: रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षपदी किरण ओसवाल यांची निवड एक मताने करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी डॉक्टर धनश्री काळे,सचिव पदी राकेश गरूड, खजिनदार पदी हर्षल पंडित यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

किरण ओसवाल रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष असून जैन सोशल ग्रुपचे संस्थापक, तळेगाव स्टेशन जनरल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष, तळेगाव जेसीजचे माजी अध्यक्ष, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य असून अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. या संदर्भात बोलताना अध्यक्ष किरण ओसवाल म्हणाले की गोल्डन रोटरी ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यावर आमचा भर राहील. विविध कंपन्यांच्या सी एस आर फंडामधून तळेगाव शहरांमध्ये विविध समाज उपयोगी कामांच्या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष किरण ओसवाल,दीपक फल्ले,संतोष परदेशी यांनी सांगितले आहे.

राकेश गरुड हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांची निवड करण्यात आली.डॉक्टर धनश्री काळे या पिंपरी चिंचवड होमिओपॅथी कौन्सिलच्या माजी सेक्रेटरी आहेत तर हर्षल पंडित हे स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक आहेत. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी, क्लब ट्रेनर दीपक फल्ले, उपाध्यक्ष प्रशांत रामचंद्र ताये, सेक्रेटरी प्रदीप टेकवडे, चेतन पटवा, रितेश फाकटकर व विकी बेल्हेकर हे संचालक म्हणून काम पाहतील.

क्लब ट्रेनर दीपक फल्ले, रोटरी गोल्डनचे अध्यक्ष संतोष परदेशी, ट्रस्टचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी संचालक मंडळाची निवड जाहीर केली. किरण ओसवाल व राकेश गरुड यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!