वडगांव मावळ (प्रतिनिधी) ग्रामदैवत तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराजांचा उत्सव चैत्र पौर्णिमा शनिवार दि. १२/४/२०२५ ते रविवार १३/०४/२०२५ रोजी साजरा होत आहे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर सुरेश ढोरे, व कार्याध्यक्ष बाळासाहेब तुमकर यांनी दिली.
यावेळी पहाटे ४ वाजता श्री पोटोबा महाराजांचा अभिषेक ६ वाजता श्री हनुमान जन्म सकाळी ७ ते ८ वा छबीना दुपारी ४ वाजता मानाचे बगाड सायं ५ वाजता मानांच्या काठ्या रात्री ८ ते ९ फटाक्यांची अतिषबाजी व रात्री १० वाजता भजन स्पर्धा पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होईल. रात्री ९ वा. गौतमी पाटील यांचा मनोरंजनाचा बहारदार गाण्यांचा व नृत्याचा कार्यक्रम पंचायत समिती चौक येथे होईल
रविवार दि.१३/०४/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता श्रीं च्या पालखी बरोबर बाल भजनी मंडल आळंदी यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होईल. दुपारी ३ वाजता जंगी निकाली कुस्तीचा आखाडा भेगडे लॉंस शेजारी मैदानात होईल.
कार्येक्रमाचे आयोजन अध्यक्ष सुधीर सुरेश ढोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब धोडिबा तुमकर, कार्यक्रम प्रमुख अतुल प्रकाश ढोरे, विशाल नंदकुमार म्हाळसकर, उपाध्यक्ष किरण म्हाळसकर, सोमनाथ नामदेव धोंगडे, प्रशांत बाळासाहेब भिलारे अनिल भागुजी ओव्हाळ, सचिव तुषार वसंत वहिले, सहसचिव विनोद बाळासाहेब ढोरे, खजिनदार अनिल बबन कोद्रे, सहखजिनदार शेखर खंडूजी वहिले, प्रसिध्दी प्रमुख संजय सजन दंडेल
संघटक- समिर राजेंद्र दंडेल, सुर्यकांत भिलारे, संकेत चव्हाण, अभिमन्यु कुडे, निखिल वहिले, स्वपनील च. ढोरे, अभिजीत ना. ढोरे, अमोल का. ढोरे, पप्पु द. ढोरे,
कार्यकारिणी सदस्य – गणेश अर्जुन ढोरे, राजेंद्र हनुमंत म्हाळसकर, रमेश नारायण ढोरे, भाऊसाहेब तुकाराम ढोरे, संदिप वहिले, शिवाजी वसंतराव येळवंडे, सतीश गाडे, भुषण मुथा, अतुल चद्रकांत राऊत, सुहास विनोदे, सनी बेल्हेकर, विनयक लवंगारे, योगेश वाघवले आदी जन करणार आहेत.




















