Homeमहत्त्वाचेघराला भीषण आग — मोठ्या प्रमाणात नुकसान; दोन भरलेले सिलेंडर सुरक्षित बाहेर...

घराला भीषण आग — मोठ्या प्रमाणात नुकसान; दोन भरलेले सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले

वडगाव मावळ : कान्हे फाटा परिसरात एका घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कान्हे फाटा येथील ग्रामसेवक यांनी दिलेल्या वर्दीनंतर वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल तसेच वडगाव पोलीस ठाणे प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली.

या आगीत घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रिक साहित्य व इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, घरात ठेवलेले दोन भरलेले गॅस सिलेंडर वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या बचाव कार्यात वडगाव अग्निशमन दलाचे जवान ताहीर मोमिन, प्रदीप तुमकर, विनोद ढोरे आणि समीर दंडेल यांनी धाडसाने काम केले. तसेच तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाचे धीरज शिंदे, अनुपम सिंग, शेखर खोमणे, आकाश ओव्हाळ, अक्षय घोडेकर आणि भास्कर माळी यांनीही तत्परतेने सहभाग घेत आग नियंत्रणात आणण्यास मोलाची मदत केली.

घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल व पोलिस प्रशासनाच्या जलद आणि धाडसी कामगिरीचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!