घोरावडेश्वर डोंगरावर वाहनांसाठी रस्ता तयार करावा. ज्येष्ठ नागरिकांची मागणी
शेलारवाडी : मावळ तालुक्यातील शेलारवाडी जवळील घोरावडेश्वर डोंगरावर असलेल्या शिव मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी चार चाकी वाहनानकरिता रस्ता तयार करावा अशी मागणी असंख्य भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे. वाहनां करता रस्ता करावा अशी विशेषत ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे. घोरवडेश्वर मंदिरात दर श्रावणी सोमवारी तसेच शनिवार रविवार सोमवार या दिवशी बरीच गर्दी असते. अलीकडच्या काळात अनेक तरुण मंडळी पर्यटन स्थळ म्हणून रोजच या डोंगरावर येत असतात. एक रमणीय स्थळ म्हणून हे स्थान उदयास आलेले आहे.
साधारण दोन हजार वर्षांपूर्वीचे शंकराचे प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे. माघ महिन्यात शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी लोटते. आपणही देवदर्शनाला जावे असे असंख्य वयस्कर मंडळींना वाटते. परंतु डोंगर चढून जाणे शक्य नसल्याने मनातील इच्छा मनातच राहून जाते.
याचा विचार करून सरकारने डोंगरातून रस्ता तयार करावा. जेणेकरून कारने घोरवडेश्वर शिव मंदिरापर्यंत जाणे शक्य होईल. या देवस्थान संदर्भात कार्य करणाऱ्या मंडळींनी सरकार दरबारी हा विषय लावून धरावा असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. या स्थळाचा अधिक विकास करण्यासाठी डोंगरातून रस्ता केल्यास येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११






















