Homeक्राईमजनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही कर्तव्यावर हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी महसूल सहाय्यक मिनेश चंद्रमणी बानखडे (वय 40, रा. लामाँटेना सोसायटी, वडगाव मावळ) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 156/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच जनगणना अधिनियम 1948 मधील कलम 5 व 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश देवराम आवारे (नियुक्ती – न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड, ता. मावळ) आणि राजेंद्र बबनराव कदम (नियुक्ती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोखली, ता. मावळ) यांची जनगणना 2027 साठी प्रगणक (Enumerator) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र दि. 16 मे 2026 पासून ते 23 मे 2026 पर्यंत त्यांनी कामावर हजेरी लावली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून राष्ट्रीय महत्त्वाच्या सरकारी कामात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जनगणना कार्य हे केंद्र सरकारचे अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील काम मानले जाते. नागरिकांची सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्यात्मक माहिती संकलित करण्यासाठी या प्रक्रियेला विशेष महत्त्व असते. अशा परिस्थितीत नियुक्त प्रगणक गैरहजर राहिल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.

हा गुन्हा 23 मे रोजी रात्री 11.06 वाजता दाखल करण्यात आला असून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ यांना प्रथमवर्दी अहवालाची प्रत पाठविण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजय सुपे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!