Homeसामाजिकजिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन रोडवरील धूसर झालेले गतिरोधक रंगवा. सामाजिक कार्यकर्ते...

जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन रोडवरील धूसर झालेले गतिरोधक रंगवा. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांची मागणी

जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन रोडवरील धूसर झालेले गतिरोधक रंगवा. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांची मागणी

तळेगाव दाभाडे : येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे लेखी निवेदन घेऊन जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन या रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधक वरील पांढरे पट्टे धुसर झाले असून पावसाळ्यापूर्वी ते रंगवण्यात यावेत तसेच या रोडवरील बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी मिलिंद अच्युत यांनी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन हा प्रमुख रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. असेच या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात बेशिस्त कार पार्किंग करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात फुटपाथ वरील अनधिकृत व्यवसाय करणारे देखील जागा आडून ठेवत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा या प्रमुख रस्त्यावर सतत जाणवत असल्याने त्वरित सदरील रस्त्याला वाहतूक साठी मोकळा करून द्यावे असे दिलेले निवेदनात म्हटले आहे.

जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन या मुख्य रस्त्यावर गतिरोधकांवरील पांढरे पट्टे धुसर झाल्याने वाहन चालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर वरचेवर लहान मोठे अपघात घडत आहेत. गतिरोधकाच्या ठिकाणी तातडीने पांढरे पट्टे मारणे गरजेचे आहे. तसेच पुढे गतिरोधक आहे असे फलक लावणे आवश्यक आहे. या रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांनी केली आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!