Homeक्राईमजुना खंडाळा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील ३० लाखाचा ऐवज हस्तगत या घरफोडी...

जुना खंडाळा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील ३० लाखाचा ऐवज हस्तगत या घरफोडी प्रकरणी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे

जुना खंडाळा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील ३० लाखाचा ऐवज हस्तगत या घरफोडी प्रकरणी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे

लोणावळा : शहरातील जुना खंडाळा येथील एका बंद असलेल्या घरात झालेल्या घरफोडी प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्यीय गुन्हेगारास अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या घरफोडी प्रकरणी दि ९जुन २०२५ रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बिना मुळे(वय ६५) यांनी फिर्याद दिली होती. या घरफोडी मध्ये ४७ तोळे सोने आणि २ किलो चांदी असा सुमारे २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज या चोट्याने लंपास केला होता. या घरफोडी प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते.

सदरील गुन्ह्याच्या अनुषंगाने लोणावळा स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते त्यात तिघे चोरटे रेल्वेने पिंपरी चिंचवड कडे जाताना आढळून आले. दिनांक १६ जुन २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वडगाव मावळ येथे सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावे चंद्रकांत उर्फ चंदू माने(वय ३२ राहणार चिंचवडगाव) आणि धनंजय काळे( वय २० राहणार चिंचवडगाव) यांनी सदरील गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता चोरी केलेला ऐवज दीपक मदगे ( राहणार कर्जत) आणि कैलास जाट ( राहणार वाशी) यांच्या मदतीने विकल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३४तोळे सोने. २ किलो चांदी असा एकूण ३० लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.

प्रमुख आरोपी चंद्रकांत माने हा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ५०हुन अधिक गुन्हे कर्नाटक. सोलापूर. चेन्नई. पुणे. पिंपरी चिंचवड येथे दाखल आहेत. काही दिवसापूर्वीच प्रमुख आरोपी चंद्रकांत माने हा चेन्नई येथील गुन्ह्यातून जामिनावर सुटून बाहेर आला होता. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाधरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई अभिजीत सावंत, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस शिपाई रमेश भिसे, पोलीस शिपाई सूर्यकांत वाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल पवार, सागर नामदास, विराज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईक नवरे, समीर तांगडे, पोलीस शिपाई मुकुंद कदम, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार संदीप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले, यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!