टोल नाक्यावर ॲम्बुलन्स साठी स्वतंत्र लेन असावी हा नियम असताना देखील सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर नियमांचे सर्रास उल्लंघन
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. या गर्दी मधून वाट काढत ॲम्बुलन्स न्यावी लागते. ॲम्बुलन्स मध्ये असलेल्या रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असते. टोल नाक्यावर लागणाऱ्या वेळेमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे ॲम्बुलन्स साठी स्वतंत्र लेन झाल्यास त्यांना कोणताही विलंब न होता जलद मार्गाने जाणे शक्य होईल. अनेक ठिकाणी टोल नाक्यावर ॲम्बुलन्स साठी ग्रीन कॅरिडॉर तयार करण्याची शिफारस करण्यात आली असून यामध्ये ॲम्बुलन्स साठी एक वेगळी लेन तयार केली जाते.
जिथे इतर कोणत्याही वाहनांना परवानगी नसते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) ने टोल नाक्यावर १० सेकंदापेक्षा जास्त वेळ गाड्यांना थांबावे लागणार नाही तसेच प्रत्येक टोलनाक्यावर ॲम्बुलन्स साठी स्वतंत्र लेन असावी असा नियम असताना देखील सोमाटणे व वरसोली या टोलनाक्यावर ॲम्बुलन्स साठी स्वातंत्र्य लेनच नाही.
हे सरळ सरळ नियमांचे उल्लंघन आहे. ॲम्बुलन्स साठी टोल नाक्यावर स्वतंत्र लेन असणे ही काळाची गरज आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यास वेळ लागणार नाही. आणि त्यांचे प्राण वाचवण्यासही मदत होईल. तरी शासनाने सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर ॲम्बुलन्स साठी स्वतंत्र लेन करावी अशी मागणी अनेक वाहन चालक व ॲम्बुलन्स चालकांनी केली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















