Homeक्राईमतरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कायद्याची लोणावळा शहरात कडक...

तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कायद्याची लोणावळा शहरात कडक अंमलबजावणी करा. लोणावळ्यातील सर्वपक्षीय संघटनांची मागणी

तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कायद्याची लोणावळा शहरात कडक अंमलबजावणी करा. लोणावळ्यातील सर्वपक्षीय संघटनांची मागणी

लोणावळा : तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कायद्याची लोणावळा शहरात कडक अंमलबजावणी करा अशी मागणी लोणावळा शहरातील सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने लोणावळा शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय शहराध्यक्ष व नेतेमंडळी यांनी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे.

लोनावळा शहरात मागील काही महिन्यांपासून लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण हे या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये सापडत असल्याचे या सर्व नेते मंडळींनी अधोरेखित केले आहे. ड्रग्स, गांजा, चरस, एमडी पावडर, फ्लेवर हुक्का अशा पदार्थांचे सेवन तरुण पिढी मोठ्या प्रमाणात करू लागली आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणारे हे पदार्थ सर्रासपणे लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत आहेत.

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड भागातून हे पदार्थ लोणावळा शहरांमध्ये विक्रीसाठी आणले जातात. सदरचे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची एक मोठी चैन या शहरामध्ये तयार झाली असल्याचा आक्षेप या नेते मंडळींनी नोंदवला आहे. विविध खाद्यपदार्थांच्या माध्यमातून मुलांना नशा करण्याची सवय लावली जाते नंतर हेच व्यसनाधीन झालेले तरुण इतर मुलांना व्यसनाधीन करण्यासाठी वापरले जातात अशी ही एक मोठी साखळी तयार झाली असल्याचे यावेळी सर्व नेते मंडळींनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, माजी नगरसेवक देविदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, शिवसेना शहर प्रमुख संजय भोईर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष परेश बडेकर, भाजपा माजी शहराध्यक्ष अरुण लाड, काँग्रेस शहराध्यक्ष राजू गवळी, आरपीआयचे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, मनसेचे शहर अध्यक्ष निखिल भोसले, माजी नगरसेविका आरोही तळेगावकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष उमाताई मेहता, दिलीप पवार, दादा धुमाळ, बाबा शेट्टी, अमित भोसले, जितेंद्र कल्याणजी, विकी बोत्रे, सलीम मणियार, संतोष कचरे, दीपक कांबळे, विशाल पाठारे, श्रवण चिकणे आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी सदरचे निवेदन स्वीकारले असून .लोणावळा शहरांमध्ये अंमली पदार्थ व कोणताही गैरप्रकार होणार नाही, कुठेही असे प्रकार होताना आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. सोबतच ट्रिपल सीट जाणारे दुचाकी, वाहन चालवणारे अल्पवयीन मुले, वाहनांचे सायलेन्सर बदलून आवाज करणारी वाहने, काळ्या काचा यावर देखील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी देखील अशा प्रकारे कोठे अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास त्यावर देखील तात्काळ कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. लोणावळा शहरातील पान टपरी देखील वेळेत बंद होईल असे त्यांनी सांगितले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!