
तळेगावात युतीचा फज्जा! फक्त ४९.२४ टक्के मतदानातून जनतेची नाराजी उघडी
तळेगाव दाभाडे येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अवघे ४९.२४ टक्के मतदान नोंदवले गेले. शहरातील राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी केलेल्या युतीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र या युतीवर मतदारांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे मतदानाच्या आकड्यांतून दिसून आले.


तळेगाव मध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या राजकीय हालचाली, गटबाजी, तसेच युतीनंतर निर्माण झालेला गोंधळ यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे बोलले जाते. तळेगावातील तरुण आणि नवमतदार विशेषतः मतदानापासून मागे राहिल्याची नोंद काही ठिकाणी झाली.


नागरिकांच्या मते, “स्थानिक प्रश्न विसरून राजकीय सोयिस्कर गणिते करण्याचा” प्रयत्न झाल्याने मतदारांनी थंड प्रतिसाद दिला. त्यामुळे या युतीला मिळालेला हा ‘मतांचा दणका’ पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे.


एकूणच, तळेगाव दाभाडे येथील मतदानाचा कमी टक्का हा जनतेची नाराजी आणि असंतोषाची ठळक नोंद म्हणून समोर येत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















