तळेगावात रोडवर खड्डे का खड्ड्यात रोड
तळेगाव दाभाडे : येथील भेगडे तालीम ते जिजामाता चौक ते शिवशंकर कॉर्नर या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पंधरा ते वीस फुटावर मोठ मोठे खड्डे पडलेला असून अनेक खड्डे हे रोडला समांतर आहे रोडच्या एका बाजूला सुरू होऊन तो खड्डा दुसऱ्या बाजूपर्यंत आहे हा रोड वर्दळीच्या रोड आहे याच रोडने दररोज हजारो वाहनांचा प्रवास होत असतो. टू व्हीलर रिक्षा फोर व्हीलर इत्यादी वाहने या रोडने दररोज जात आहे.
रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी या रोडने जातात, शाळेतील विद्यार्थी जातात येथील स्थानिक रहिवाशी चेतन भगवान भेगडे यांनी सांगितले की या रोडवर जे खड्डे पडले आहे त्यामुळे वाहनांचे नुकसान होते. खड्ड्यांमुळे वाहनाचे टायर फुटणे, अलाॅय व्हिल खराब होणे, गाडीचा खालचा भाग खड्ड्यांमुळे घासणे इंजिनाला नुकसान होणे, शारीरिक दुखापत, खड्ड्यांमुळे अचानक होणाऱ्या धक्क्यामुळे पाठ दुखी मान दुखी स्नायूदुखी तसेच मणक्याला दुखापत होऊ शकते विशेषतः गर्भवती महिलांना गर्भपाताचा धोका होऊ शकतो त्यामुळे या रस्त्याची नगरपालिका प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अनेक रिक्षाचालकांनी देखील हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















