Homeमहत्त्वाचेतळेगावात सकाळच्या धुक्याची चादर – वातावरणात गारवा वाढला

तळेगावात सकाळच्या धुक्याची चादर – वातावरणात गारवा वाढला

तळेगावात सकाळच्या धुक्याची चादर – वातावरणात गारवा वाढला

तळेगाव दाभाडे : आज सकाळी तळेगाव शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासून हवामानात अचानक बदल जाणवू लागला व शहरातील रस्ते, घरे, झाडे, वाहनांसमोर पांढऱ्या धुक्याचे आच्छादन दिसू लागले. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत होते, त्यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू होती.

धुक्यामुळे फक्त पंधरा ते वीस फूटापर्यंतच दृश्य दिसत होते. सकाळी फिरायला जाणारे नागरिक, शाळकरी मुले व कामानिमित्त बाहेर पडणारे लोक धुक्यातून वाट काढताना दिसून आले.

पावसाळ्याचा परिणाम

यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला असून सप्टेंबरपर्यंत तो कायम आहे. मागील चार महिन्यांपासून नागरिकांना कडक उन्हाचा अनुभव आलेला नाही. मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे वर्षभर पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मात्र, उन्हाळा कडक झाला तर पाण्याचे बाष्पीभवन होऊन साठा कमी होण्याची शक्यता नेहमीच असते. तरीदेखील तळेगाव परिसरात पूर्वी कधीही तीव्र पाणीटंचाई जाणवली नसल्याचा अनुभव नागरिक मांडतात.

थंडीचा वेध

आज सकाळपासूनच गारठा जाणवत असून, “यंदा थंडी लवकरच येते का?” असा प्रश्न अनेकांच्या चर्चेत होता. सध्या पितृपक्ष सुरू असून त्यानंतर अश्विन महिना व दिवाळीचे दिवस जवळ आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मते, “यंदा दिवाळीत पूर्वीप्रमाणे कुडकुडणारी थंडी पडण्याची शक्यता आहे.”

आरोग्याचा प्रश्न

अचानक वाढलेल्या गारवामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत. लहान मुले, वृद्ध व आजाराने त्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!