तळेगाव ची कन्या डॉ ऋतिका राठोड हिला नीट पीजी परीक्षेत भारतातून २६४ वी रॅक
तळेगाव दाभाडे : शहराची कन्या डॉ ऋतिका विनोद राठोड हिने NEETPG 2025 या स्पर्धात्मक परीक्षेत भारतातून २६४ वी रॅक मिळवून अभिमानास्पद यश संपादन केले आहे.डाॅ ऋतिका हिने डी व्हि व्हि पी एफ मेडिकल कॉलेज अहिल्यानगर येथून एमबीबीएस पूर्ण केले.नीट पीजी परीक्षेला यावर्षी भारतातून तब्बल २.५ लाख विद्यार्थी बसले होते.
तळेगावातील पुनमचंद राठोड यांची ऋतिका ही नात असून. प्रसिद्ध राठोड ज्वेलर्स चे संचालक विनोद राठोड यांची कन्या तर डॉक्टर गिरीश राठोड, उद्योजक सचिन राठोड यांची पुतणी आहे.डाॅ ऋतिका हिचे पुढे रेडिओलॉजी शाखेत उच्च शिक्षण घेण्याचा मानस असून प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पुढील वाटचाल करण्याचे तिचे स्वप्न आहे.
ऋतिका हिच्या उज्वल यशाचे तळेगाव व मावळ तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




