Homeशिक्षण-प्रशिक्षणअध्यापक महाविद्यालयात बी.एड. आणि एम.एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

अध्यापक महाविद्यालयात बी.एड. आणि एम.एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

अध्यापक महाविद्यालयात बी.एड. आणि एम.एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

वडगाव मावळ : श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ येथे प्रथम वर्ष बी.एड. आणि एम.एड.च्या नव्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ‘स्वागत समारंभ (Induction Programme)’ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक या भूमिकेबद्दल आत्मभान निर्माण करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रक्रियेच्या परंपरेशी त्यांचा परिचय करून देणे हा या उपक्रमाचा हेतू होता.

Oplus_16908288

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता धायगुडे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयीन कार्यप्रणालीचा प्रवास आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेत नव्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनानंतर प्रमुख पाहुण्या, सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ. धनश्री चौधरी यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून “स्त्रीशक्ती आणि शिक्षकाची सामाजिक भूमिका” या विषयावर मार्गदर्शन केले. संत परंपरेचा वर्तमान काळातील संदेश त्यांनी समर्पक उदाहरणांतून उलगडला.

Oplus_16908288

कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे, ‘अंबर’ साप्ताहिकाचे संपादक सुरेशजी साखवळकर यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना स्वतःच्या आयुष्यातील अनुभव कथन केले. त्यांनी गायलेल्या सुश्राव्य अभंगांनी वातावरण भारावून गेले.

त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थिनी —

निकिता मावळे (बी.एड.), प्राजक्ता ढोरे (बी.एड.) आणि प्रियांका बहिरट (एम.एड.) — यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रथम वर्ष बी.एड. प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प व पेन देऊन करण्यात आले.

संस्थेचे संचालक सदस्य राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उत्कृष्ट शिक्षक होण्यासाठी आत्मविकासाचा मंत्र दिला.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव मा. अशोकजी बाफना यांनी विद्यार्थ्यांना अद्ययावत राहण्याचे आणि पुढील दोन वर्षांत महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सदस्य प्रल्हाद जांभुळकर, चंद्रकांत ढोरे, दत्ताभाऊ असवले, राजेश बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक महादेव सांगळे, सहप्रा. डॉ. कविता तोटे, डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, ज्योती रणदिवे, सोनाली पाटील-महाजन, शबाना मोकाशी, डॉ. दीपा नेवसे, संध्या घोडके, ग्रंथपाल सुजाता जाधव-गंभीरराव आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी समन्वय साधला.

द्वितीय वर्ष बी.एड. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सहकार्य केले.

कार्यक्रमाचे नियोजन सह.प्रा. डॉ. शीतल देवळालकर आणि सहा.प्रा. ज्योती रणदिवे यांनी केले.

सूत्रसंचालन नेहा खानेकर व दर्शना सकटे यांनी तर आभार प्रदर्शन सहा.प्रा. डॉ. अनामिका कावरे यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ या मंगल स्तोत्राने झाली.

संस्थेचे संस्थापक माजी मंत्री मा. मदनजी बाफना, अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे व सचिव अशोक बाफना यांनी कार्यक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे मो. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!