Homeमहत्त्वाचेतळेगाव ते सावळा मार्गावर नादुरुस्त बस गाड्या. एसटी महामंडळाचे दुर्लक्ष

तळेगाव ते सावळा मार्गावर नादुरुस्त बस गाड्या. एसटी महामंडळाचे दुर्लक्ष

तळेगाव ते सावळा मार्गावर नादुरुस्त बस गाड्या. एसटी महामंडळाचे दुर्लक्ष

तळेगाव दाभाडे : एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाकडून ग्रामीण भागातील प्रवाशांकडे होणारे दुर्लक्ष दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तळेगाव ते सावळा या सुमारे 50 किमी लांब अंतरासाठी महामंडळ जुन्या, नादुरुस्त व अपुऱ्या देखभाल केलेल्या एसटी गाड्या पाठवत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ होतो आहे.

हा मार्ग अत्यंत अरुंद, वळणदार, आणि दर्‍या खोऱ्यांनी भरलेला असताना देखील चालविण्यात येणाऱ्या बस गाड्या बऱ्याचशा धोकादायक स्थितीत आहेत. अनेक बस गाड्यांचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या स्थितीत आहेत, काही गाड्यांमध्ये आपत्कालीन दरवाजेही बंदिस्त असून दरवाजे दोऱ्यांनी बांधून ठेवले जात आहेत. शिवाय वेळेचे कोणतेही बंधन नसल्याने बस वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. या मार्गावर शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांचा प्रवास असतो. त्यामुळे जर अपघात घडला, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्षच केले आहे. जर या नादुरुस्त बसमुळे काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? तळेगाव ते सावळा या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी यासंदर्भात म्हणाले की मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांनी या भागासाठी नवीन बस उपलब्ध करून द्यावी.

तळेगाव ते सावळा या बसच्या तिकीट दरात प्रचंड वाढ करूनही सुविधा तशाच ढिसाळ आहे. तळेगाव ते सावळा एकेरी तिकीट दर 101 रुपये तर सावळा ते कान्हे फाटा 81 रुपये इतका असूनही प्रवाशांना चांगल्या व सुस्थितीमध्ये असलेल्या बस मिळत नाही. स्थानिक प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे मागणी केली आहे की, ग्रामीण मार्गांवर देखील चांगल्या स्थितीतील, सुरक्षित व वेळेवर सेवा देणाऱ्या एसटी बस चालवाव्यात. अन्यथा, जनतेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहील.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!