
तळेगाव दाभाडे नगर परिषदेत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे : श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपमुख्याधिकारी ममता राठोड, माजी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे तसेच मीराताई फल्ले यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी नगर परिषदेचे कर संकलन लिपिक प्रविण माने, आदेश गरुड, विलास वाघमारे, प्रविण शिंदे, दक्षता भालेराव, अश्विनी गरुड, शिपाई सुरज शिंदे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.


समाजातील ऐक्य आणि प्रेरणादायी नेतृत्वाची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेले संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्त तेली समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण क्षीरसागर, सुलभा क्षीरसागर, गोकुळ किरवे, तुषार जगनाडे, श्रीकांत शेडगे, बारमुख मामा, भालचंद्र दळवी, सुजित लोखंडे, नंदकुमार किरवे, अरुण हेंद्रे, अजय शिंदे, नंदकुमार शिंदे, महेंद्र कसाबी, सुहास जगनाडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून जयंती कार्यक्रमाची शोभा वाढवली.


कार्यक्रमात तुषार जगनाडे यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनकार्याचा अल्प परिचय देत त्यांच्या कीर्तन परंपरा, समाजसेवा आणि अध्यात्मिक कार्याचे स्मरण करून दिले. त्यांनी संताजी महाराजांचे समाज एकत्रित ठेवण्याचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.


कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व शांत, भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेला जयंती सोहळा समाजाच्या एकात्मतेची जाणीव करून देणारा ठरला. नगर परिषद तसेच तेली समाजाच्या संयुक्त उपस्थितीत संताजी महाराजांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























