Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विलास भेगडे, सचिवपदी डॉ. संदीप गाडेकर यांची...

तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विलास भेगडे, सचिवपदी डॉ. संदीप गाडेकर यांची सर्वानुमते निवड

तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विलास भेगडे, सचिवपदी डॉ. संदीप गाडेकर यांची सर्वानुमते निवड

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनची सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२१ सप्टेंबर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सभेचे पिठासन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार योगेश्वर माडगूळकर होते.

यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी दै. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे व सचिवपदी महाऑनलाईन न्यूजचे संपादक डॉ. संदीप गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रेस फाउंडेशनचे सल्लागार विवेक इनामदार, मंगेश फल्ले, संस्थापक अध्यक्ष अमिन खान, कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे, उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, खजिनदार अंकुश दाभाडे, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, ज्येष्ठ सदस्य राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, सुरेश शिंदे, चित्रसेन जाधव, अमित भागीवंत, मयूर सातपुते, सुजल गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना विवेक इनामदार म्हणाले, पत्रकारितेमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. AI तंत्रज्ञान आल्यामुळे डिजिटल पत्रिकारितेमधील आव्हाने वाढली आहेत. राज्य पत्रकार संघाच्या पत्रकारांसाठी असलेल्या प्रकल्प उपक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकार यांनी देखील खंबीर साथ देण्याचा शब्द दिला आहे. संवादातून पत्रकारांनी जागल्याची भूमिका निभवावी.

योगेश्वर माडगूळकर म्हणाले, पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्राधान्य क्रमाने करावे. सर्वसामान्य नागरिक व प्रशासन यांना जोडणारा पत्रकार हा दुवा आहे. पत्रकारांनी निर्भीडपणे काम करावे.

अमीन खान म्हणाले, पत्रकारिता हा आपला धर्म असून तळागाळातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम प्राधान्याने करावे. निर्भीडपणे काम करतानाकोणाच्याही दबावाला बळी पडू नये.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विलास भेगडे व सचिव डॉ.संदीप गाडेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

स्वागत व सूत्रसंचालन जगन्नाथ काळे यांनी केले. रेखा भेगडे यांनी आभार मानले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!