तळेगाव नाट्य परिषदेतर्फे व्हाईस आर्टिस्ट प्रतीक जगदाळे यांचा सत्कार
तळेगाव दाभाडे :
नाट्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा व्हाईस आर्टिस्ट, सूत्रसंचालक व अँकर प्रतिक बाबासाहेब जगदाळे यांचा तळेगाव दाभाडे नाट्य परिषदेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन नाट्य परिषद तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग प्रदेश सरचिटणीस महेंद्र शेलार, प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे, मावळ तालुका उपाध्यक्ष उमेश रटाटे, साऊथ चित्रपट अभिनेते कैवल्य भुत्ये, मराठी चित्रपट अभिनेते गोविंद राठोड, तसेच नाट्य परिषदेचे पदाधिकारी नितेश शहा, विश्वास देशपांडे (काका), संजय वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतीक जगदाळे यांची कामगिरी
मोशन फिल्म स्टुडिओ सोलापूरचे युवा कलाकार, प्रोफेशनल अँकर व व्हाईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण केलेले प्रतिक जगदाळे सध्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नेत्र विभागात ओटी टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी विद्यार्थी चळवळ, सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून –
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (सोलापूर कृषी शिक्षण) विद्यार्थी प्रमुख
स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र : अधिकृत कर्मचारी व सूत्रसंचालक
दैनिक लोकमत व आदर्श लोकमत सखी मंच उपक्रमांमध्ये निवेदक व सूत्रसंचालक
बालचित्रपट महोत्सव, रोड शो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन
या सर्व माध्यमातून त्यांनी युवा पिढीला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कौतुक सोहळा
प्रतिक जगदाळे यांच्या या यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळ्याचे आयोजन अभिजीत आपटे व उमेश रटाटे यांनी केले होते.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी प्रतीकच्या कार्याचा गौरव करत त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. तर नाट्य परिषदेच्या माध्यमातून अशा तरुण कलाकारांचा गौरव सतत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















