Homeसामाजिकतळेगाव मध्ये स्वच्छता गृहांचा अभाव

तळेगाव मध्ये स्वच्छता गृहांचा अभाव

तळेगाव मध्ये स्वच्छता गृहांचा अभाव

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठेचे व तालुक्यातील जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून तळेगाव दाभाडे शहराची ओळख आहे. शहराची लोकसंख्या एक लाखाच्या पुढे आहे तसेच तळेगाव शहर हे झपाट्याने वाढत आहे. शहरात अनेक नागरिक कामानिमित्त व व्यवसायानिमित्त येतात मात्र शहरांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिकांची विशेषतः महिलांची मोठी कुचुंबना होत आहे.

एवढे मोठे शहर असताना येथे केवळ भेगडे तालीम चौक, चावडी चौक, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक, तळेगाव स्टेशन बाहेर याच ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. जिजामाता चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील स्वच्छतागृहास गेल्या एक वर्षापासून टाळे ठोकले आहे.

जी स्वच्छतागृहे आहेत त्या स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतागृहाची स्वच्छता करतच नाही. मागील काही महिन्यापूर्वी तळेगावात स्वच्छतागृहे बांधली जातील असे आश्वासन आमदार खासदारांनी दिले होते त्या आश्वासनाचे पुढे काय झाले? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

शहरात स्वच्छतागृहांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे. विशेषतः महिलांना याचा जास्त त्रास होत आहे. मध्यंतरी शहरातील खळदे आळी येथील शासकीय स्वच्छतागृह दिवसाढवळ्या जमीन दोस्त करण्यात आले याचा देखील तपास अजून लागलेला नाही नगरपरिषद प्रशासन झोपलेले आहे. का असा देखील प्रश्न नागरिक विचारत आहे. आमदार खासदारांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

शहरातील श्रीमंत ताटे, चेतन भेगडे, राहुल बोत्रे आदी नागरिकांनी नगरपरिषद. आमदार खासदारांकडे मागणी केली आहे की स्वच्छतागृहासाठी पुढाकार घेऊन स्वच्छतागृहाशी संबंधित योजनांची योग्य अंमलबजावणी करावी व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. आणि शहरात स्वच्छतागृहाची संख्या वाढवावी.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!