तळेगाव येथील संजीवनी मुलींचे वस्तीगृहात मोफत योगा क्लास सुरू
तळेगाव दाभाडे : शहरातील स्टेशन भागात तपोधाम कॉलनी येथे असणाऱ्या संजीवनी मुलींचे वसतिगृह येथे पाच वर्ष ते बारा वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत योगा क्लासेस आयोजन आयुष मंत्रालय योगचिकित्सक स्मिता डेकाटे यांच्याकडून रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ असून सुरू करण्यात आले आहे.
सदर योगा क्लास हा सर्व मुलींसाठी मोफत असणार आहे. या संदर्भात माहिती देताना स्मिता डेकाटे म्हणाल्या की योगा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. योगा क्लासची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांकडून आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गुळवेल व अमृतवेल या वनस्पतीचे वृक्षारोपण करून करण्यात आली.
जर कोणाला या योगा क्लासमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९९२०१३१८९३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संजीवनी मुलींचे वसतिगृह यांच्याकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















