तळेगाव येथे मोफत शिक्षक प्रशिक्षण कोर्सचे आयोजन
तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरात शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कल्याणी फाउंडेशन यांच्या वतीने मोफत शिक्षक प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून, फाउंडेशनचा उद्देश “उत्कृष्ट शिक्षक घडवणे” हा आहे.
या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. फाउंडेशनच्या माहितीनुसार कोर्समध्ये खालील महत्त्वाचे मुद्दे शिकवले जाणार आहेत :
अध्यापनाची नवी पद्धत
वर्ग व्यवस्थापनाचे कौशल्य
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला
खेळातून शिकविण्याची पद्धत
आधुनिक शिक्षण पद्धतींचे मार्गदर्शन
प्रशिक्षण कोणासाठी?
➡️ शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी : या कोर्सद्वारे अध्यापनाची मूलभूत व आधुनिक कौशल्ये मिळणार आहेत.
➡️ विद्यमान शिक्षकांसाठी : आपली अध्यापन पद्धत अधिक प्रभावी करण्यासाठी व कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी ही संधी उपयुक्त ठरणार आहे.
कालावधी व सुविधा
कालावधी : ३ महिने ते ६ महिने
प्रशिक्षण : पूर्णपणे मोफत
जागा : फक्त १० उमेदवारांसाठी मर्यादित
ठिकाण : कल्याणी फाऊंडेशन, नाना भालेराव कॉलनी, तळेगाव दाभाडे (स्टेशनजवळ)
नोंदणीची घाई करा!
मर्यादित जागांमुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन कल्याणी फाउंडेशनने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7666539196
प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११




