Homeसामाजिकत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दिव्यांचा महासागर

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दिव्यांचा महासागर

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दिव्यांचा महासागर

भाजे(मावळ)श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.

शिवस्मारकावर हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिवरायांच्या जयघोषाने नवचैतन्य निर्माण झाले होते. शिवस्मारकावर सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. शिवस्मारक परिसरात भव्य शिवसृष्टी साकारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी गणेशभाऊ धानिवले, सोनालीताई बैकर, राजू शेळके, रमेश बैकर, शंकर चिव्हे, महेंद्र बैकर, पोपट दिघे, सोमनाथ बैकर, अभिषेक बेकर, पंढरीनाथ विखार , बाळू ढाकोळ, काजल ढाकोळ, स्वाती मरगळे, स्नेहल बेकर, ज्योती धानिवले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत अंबेकर, सचिन निंबाळकर, अमोल गोरे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, संदीप भालेकर, राहुल वाघमारे, मंगेश रावणे, महेश शेळके, तात्यासाहेब भराटे, सचिन आमले, निलेश भोसले, करण निकाजू, तानाजी सागावे आदी कार्यकर्त्यांनी केले होते.

लोहगड विसापूर विकास मंच चालू वर्षात रोप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या पंचवीस वर्षात मंचाने लोहगड विसापूर किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाचे आदर्श काम उभे केले. किल्ल्यावरील शिवमंदिर सर्वप्रथम मंचांनी बांधले. त्यानंतर पुरातत्व विभागाचा पाठपुरावा करून सर्वप्रथम लोहगडला भक्कम असा गणेश दरवाजा बसविला. मुख्य द्वाराला भक्कम सागवानी दरवाजा बसविल्यामुळे महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो. पुढे मंचाच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आणि शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद झाल्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना आळा बसला. मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली. मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नांमुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडला नामांकन मिळाले असल्यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व लोहगड विसापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांतून साकारलेला हा दीपोत्सव केवळ उजेडाचा नव्हे, तर संवर्धन, संस्कार आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे.

पंचवीस वर्षांच्या अखंड कार्यातून ज्यांनी लोहगडाचे वैभव पुन्हा उभे केले — त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना मनःपूर्वक वंदन

आजचा हा उजेड फक्त दिव्यांचा नाही,

तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या शिवभक्तीचा आणि आपल्या मराठी अभिमानाचा आहे

२०२५ हे वर्ष मंचाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती यावेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!