Homeमहत्त्वाचेदसरा / विजयादशमी निमित्त मावळ बिझनेस डायरेक्टरी ॲपचे भव्य उद्घाटन

दसरा / विजयादशमी निमित्त मावळ बिझनेस डायरेक्टरी ॲपचे भव्य उद्घाटन

दसरा / विजयादशमी निमित्त मावळ बिझनेस डायरेक्टरी ॲपचे भव्य उद्घाटन

वडगाव मावळ (दि. २ ऑक्टोबर २०२५): दसरा / विजयादशमी या शुभमुहूर्तावर मावळ बिझनेस डायरेक्टरी ॲप चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या ॲपच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील व्यावसायिक, व्यापारी, शिक्षक, उद्योजक तसेच नागरिक यांना एका डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणण्याचा अभिनव प्रयत्न राबविण्यात आला आहे.

Oplus_16908288

हा उपक्रम आशादीप कॉम्प्युटरचे संचालक अयुब पिंजारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाला आहे. मावळवासीयांना डिजिटल युगाची साथ मिळावी, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन मिळावे व सर्व सेवांचा सहज लाभ नागरिकांना मिळावा या उद्देशाने हे ॲप पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या प्रसंगी संदीप बाफना, अजित देशपांडे, संदीप औटी, अंकित बाफना, बाळासाहेब बोरावके, नंदकिशोर मुगेरा, पंकज ढोरे, मयूर ढोरे, ताहीर पिंजारी, वसीम पिंजारी सह परिवार उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप दिले.

उद्घाटनाच्या वेळी बोलताना मान्यवरांनी असे प्रतिपादन केले की – “आजच्या डिजिटल युगात ग्रामीण भागातील व्यावसायिक आणि नागरिक यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडणे अत्यंत गरजेचे आहे. या ॲपच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना नवीन ग्राहकवर्ग मिळेल, रोजगार संधी वाढतील तसेच गावातील व्यवहार अधिक पारदर्शक व सुलभ होतील.”

या ॲपमध्ये स्थानिक दुकानदार, सेवा पुरवठादार, शिक्षक, डॉक्टर्स, कारागीर, व्यावसायिक संस्था इत्यादींची माहिती सहज उपलब्ध होणार असून, “एक गाव – एक ॲप” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात आले आहे.

दसऱ्याच्या शुभदिनी झालेल्या या उपक्रमामुळे मावळ तालुक्यातील व्यवसाय क्षेत्राला नवीन उभारी मिळणार असून, ग्रामीण भागाच्या डिजिटल प्रगतीला नवे अधिष्ठान मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!