Homeसामाजिकदिवाळीच्या प्रकाशात मावळचा सामाजिक दीप पूरग्रस्त मराठवाड्याला अखंड मराठा समाजाचा हात

दिवाळीच्या प्रकाशात मावळचा सामाजिक दीप पूरग्रस्त मराठवाड्याला अखंड मराठा समाजाचा हात

दिवाळीच्या प्रकाशात मावळचा सामाजिक दीप पूरग्रस्त मराठवाड्याला अखंड मराठा समाजाचा हात

लोनावळा : दिवाळीच्या उत्सवी तेजात जेव्हा प्रत्येक घर उजळून निघाले आहे, तेव्हा मावळ तालुक्यातील अखंड मराठा समाजाने या सणाला एक नवी सामाजिक ओळख दिली आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करत त्यांनी “सामाजिक दिवाळी” साजरी केली आहे.

या उपक्रमात दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट, कार्ला आणि संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर देवस्थान यांनीही मोलाचा सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा सुंदर मेळ या उपक्रमातून पाहायला मिळाला.

सप्टेंबर महिन्यात मराठवाडा भागात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांच्या हातचे पीक वाहून गेले, तर घरांतील चूल विझली. या पार्श्वभूमीवर संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी समाजाला भावनिक आवाहन केले होते — “ज्यांना शक्य आहे त्यांनी सढळ हाताने मदतीसाठी पुढे यावे.”

त्यांच्या या आवाहनाला मावळातील मराठा सेवकांनी तत्परतेने प्रतिसाद दिला आणि मदत मोहिमेचे नियोजन हाती घेतले.

मावळ तालुक्यातील व्यावसायिक, नोकरदार वर्ग, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत सुमारे १४०० मदत किट्स तयार केल्या.

या किट्समध्ये डाळ, तांदूळ, तेल, साखर, मसाले, हळद, टूथपेस्ट, साबण, वही, पेन अशा आवश्यक जीवनावश्यक आणि शैक्षणिक वस्तूंचा समावेश करण्यात आला. प्रत्येक किट काळजीपूर्वक पॅक करून ती थेट मराठवाड्यातील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली.

विशेष म्हणजे, मावळातील मराठा सेवकांची टीम स्वतः त्या भागात जाऊन घराघरांत जाऊन मदतीच्या वस्तू लोकांच्या हाती दिल्या. त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचा ओलसर प्रकाश म्हणजेच दिवाळीच्या खऱ्या दिव्याची ज्योत होती.

या उपक्रमात भाऊसाहेब हुलावळे, नरेंद्र मुऱ्हे, प्रा. चेतन देशमुख, विलास येवले, अंकुश कचरे पाटील, विनोद हुलावळे, अशोक म्हाळसकर, सुनील वाजे, नारायण खराडे, दत्ता अरगडे, ओंकार कडू, विकास घाटूळे आदींनी मन:पूर्वक सहभाग घेतला.

अखंड मराठा समाज मावळ तालुक्याने या उपक्रमातून समाजकार्याची एक नवी दिशा दाखवली आहे.

दिवाळीचा आनंद फक्त घराघरांत नाही, तर पूरग्रस्तांच्या हृदयातही उजळविण्याचे कार्य त्यांनी केले.

हीच खरी दिवाळी — माणुसकीच्या दीपाची, संवेदनशीलतेच्या सुगंधाची आणि सामाजिक बांधिलकीच्या तेजाची.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!