देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून. स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रघुवीर शेलार यांनी निवेदन दिले
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापण्यात यावी, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी व उद्यानासाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.
शेलार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून मिळणारे संपूर्ण गणवेशासाठीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेत पूर्ण गणवेशात येणे कठीण झाले आहे. हे अनुदान त्वरित मंजूर करून विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे, अशीही मागणी शेलार यांनी केली.
तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि देहू नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेला निधी लवकरात लवकर मंजूर करावा, अशी विनंती देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा कारभार अपारदर्शक असून, सामान्य जनतेला न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतंत्र नगरपरिषद ही काळाची गरज आहे असे रघुवीर शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















