देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली
देहूरोड : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात पिंपरी चिंचवड आयुक्तालय व देहूरोड पोलीस स्टेशनच्यावतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली.
यावेळी देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विक्रम बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बनसोडे म्हणाले की, अमली पदार्थांमुळे आपले जीवन उध्वस्त होते. हे होऊ नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. व्यसनापासुन दूर रहावे. चांगले जीवन जगण्यासाठी चांगले आरोग्य हवे. यासाठी अमली पदार्थांपासून रहावे. याबाबत घराघरात जनजागृती करावी व या मोहिमेला अधिक बळकट करावे, असे अवाहन केले.
विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडविण्यासाठी कष्ट करावे लागतात. ते करताना आपला मार्ग चुकला की पुन्हा मार्गावर येणे अवघड जाते. यासाठी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी अश्या अमली पदार्थांच्या वाईट सवयींपासून दूर राहावे ,असे अवाहन केले.
या वेळी देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रशांत वाबळे, मयुर घागरे, ऋुती सातुरकर, विद्या पवळे,विमल इंदे, विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव शिंदे, पर्यवेक्षिका विभावरी अभंग, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र काळोखे, क्रीडा शिक्षक निलेश मानकर, अरूण डिंबळे, जेष्ठ अध्यापिका शिला राजे, अनिता काळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















