Homeसामाजिकनवरात्रीच्या मंगल वातावरणात वडगाव शहर येथे स्त्रीशक्तीच्या कर्तुत्वाचा गौरव

नवरात्रीच्या मंगल वातावरणात वडगाव शहर येथे स्त्रीशक्तीच्या कर्तुत्वाचा गौरव

नवरात्रीच्या मंगल वातावरणात वडगाव शहर येथे स्त्रीशक्तीच्या कर्तुत्वाचा गौरव

वडगाव शहर बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ नवरात्रीच्या मंगल वातावरणात वडगाव शहर मावळ येथे स्त्रीशक्तीच्या कर्तुत्वाचा गौरव करणारा “सन्मान नवदुर्गांचा” हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. माँ दुर्गेच्या आशीर्वादाने पार पडलेल्या या सोहळ्यात मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून राबविण्यात आला.

मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वे उपस्थित: महिला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्षा मोनिका हरगुडे, मावळ तालुक्याचे आमदार सुनिल आण्णा शेळके, आधारस्तंभ सारिका शेळके, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुवर्णा राजेश राऊत

आजच्या “नवदुर्गा” – सन्मानित महिला :

सुरेखा बाळा कुंभार – अंध, अपंग मुलांची सेवा (वनस्थळी)

छाया संतोष धोंगडे – अंगणवाडी शिक्षिका

भारती मुरलीधर जाचक – आदर्श अंगणवाडी व्यवस्थापिका

सविता जाधव – फॅशन डिझायनर

सपना शिंदे – प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट

ज्योती शिंदे – घरकाम क्षेत्रात योगदान

कविता नखाते – उद्योजिका

रमा बिडवे – घरकाम

निता दुभंकर – घरकाम

या सर्व महिलांनी आपल्या कार्यातून समाजात प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा गौरव हा केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण स्त्रीशक्तीचा सन्मान ठरला.

उपक्रम संयोजन: शहराध्यक्षा पद्मावती राजेश ढोरे, युवती अध्यक्षा सौ. भाग्यश्री सुहास विनोदे यांनी केले

मनोगत वैशाली पंढरीनाथ ढोरे, सूत्रसंचालन भाग्यश्री सुहास विनोदे, आभार प्रदर्शन पद्मावती राजेश ढोरे

यावेळी रेश्मा ढोरे, अक्षता ढोरे, रुपाली चव्हाण, सविता ढोरे, रुपाली तुमकर, आनिता पाटील, पुनम जांभूळकर, सुजाता ढोरे, मंगल पगडे, मोहिनी खेंगरे, वैशाली ईंगळे, सुखविंदर कौर, विनया कडु, उर्मिला काकडे, चैताली ढोरे, आनिता ढोरे आदींसह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

या सर्व सन्मानित महिलांनी आपली निष्ठा, कर्तृत्व आणि मेहनतीच्या जोरावर समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांचा हा सन्मान “स्त्रीशक्तीचा गौरव” आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

नवरात्रीच्या पवित्र काळात सुपुत्रींचा असा सन्मान करणे ही खरोखरच हृदयस्पर्शी पहल ठरली. माँ दुर्गेच्या कृपेने अशीच प्रेरणा, शक्ती आणि साहस प्रत्येकाला लाभो अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!