Homeमनोरंजननाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाट्य अभिनेते सुरेश साखवळकर आणि...

नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाट्य अभिनेते सुरेश साखवळकर आणि नृत्यांगना डॉ मीनल कुलकर्णी यांचा रविवारी तळेगावात होणार सत्कार

नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाट्य अभिनेते सुरेश साखवळकर आणि नृत्यांगना डॉ मीनल कुलकर्णी यांचा रविवारी तळेगावात होणार सत्कार

तळेगाव दाभाडे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबई च्या वतीने संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य अभिनेते गायक पंडित सुरेशराव साखवळकर यांना जीवनगौरव तर नृत्यांगना डॉ मीनल कुलकर्णी यांना बालरंगभूमीवरील योगदानासाठी अ.सि. केळुस्कर स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी चार वाजता मुंबई माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे विश्वस्त उदय सामंत, नाट्य परिषदेचे आजीवन सदस्य शशी प्रभू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.

त्याबद्दल नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने पंडित सुरेशराव साखवळकर व डाॅ मीनल कुलकर्णी यांचा येत्या रविवारी दिनांक १५ जुन २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटल च्या रिक्रिशन हॉलमध्ये सत्कार करण्यात येणार आहे.

हा सत्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक. लेखक.डाॅ सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके असणार आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नरेश गाडेकर, सहकार्यवाह सुनील ढगे, कार्यकारी सदस्य विजयकुमार साळुंखे, हे उपस्थित राहणार आहे.

या सत्कार समारंभा नंतर बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे यांचा नाट्य सुमनांजली हा नाट्य संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, सचिव संजय वाडेकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!