नायगाव येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन दुकाने जळून खाक
कामशेत : जवळील नायगाव येथे गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून नवीन शॉपिंग सेंटर मधील तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. टोनी द ढाबा समोर असलेल्या नवीन शॉपिंग सेंटर मध्ये श्री गजानन इलेक्ट्रॉनिक अँड कार टेप सेल, एकविरा मटण खानावळ व त्याच्या शेजारील आणखी एक अशी तीन दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत.
या आगीत कोणीही जखमी झाले नाही मात्र संबंधित दुकान मालकांचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे. एका नागरिकाला दुकानातून धूर येत असून शटर लाल झाल्याचे दिसले. त्याने त्वरित दुकान मालकाला फोन करून या संबंधित घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वडगाव मावळ व तळेगाव एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.
त्यांनी तासाभरात ही आग आटोक्यात आणली. या वेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले की महावितरण ने आठ ते दहा वर्षे झाले तरी येथील पोल व ताराशी संबंधित कोणतीही कामे केलेली नाही.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















