Homeसामाजिकनियमपालनाची सुवासिक दखल! तळेगाव दाभाडेत आदर्श रिक्षाचालकांचा गुलाबपुष्पाने सन्मान

नियमपालनाची सुवासिक दखल! तळेगाव दाभाडेत आदर्श रिक्षाचालकांचा गुलाबपुष्पाने सन्मान

तळेगाव दाभाडे : रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवित आदर्श रिक्षाचालकांचा सन्मान केला. मराठा क्रांती चौकातील आदर्श रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षा चालक सदस्य परिवहन खात्याच्या नियमांचे काटेकोर पालन करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांमध्ये नवचैतन्य संचारले.

या वेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी API गणेश लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्यासोबत तळेगाव पोलीस ठाण्याचे वाघ साहेब तसेच वाहतूक शाखेतील व पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नियमपालन करणाऱ्या रिक्षाचालकांचे कौतुक करताना, त्यांनी ही बाब इतर चालकांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

API गणेश लोंढे यांनी यावेळी उपस्थित रिक्षाचालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रवासी वाहतूक ही केवळ उपजीविकेचे साधन नसून सामाजिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन करून, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षित सेवा देणे हे प्रत्येक रिक्षाचालकाचे कर्तव्य आहे.” तसेच, वाहतूक पोलिसांशी सहकार्य ठेवून काम केल्यास रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमातून वाहतूक पोलिस प्रशासन सर्वसामान्य नागरिक, प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश देण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियान केवळ कारवाईपुरते मर्यादित न ठेवता, चांगल्या कामाची दखल घेऊन प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले. उपस्थित रिक्षाचालकांनीही भविष्यात नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!