Homeमहत्त्वाचेनियमबाह्य एल ई डी हेडलाईटस मुळे अपघातात वाढ 

नियमबाह्य एल ई डी हेडलाईटस मुळे अपघातात वाढ 

नियमबाह्य एल ई डी हेडलाईटस मुळे अपघातात वाढ 

तळेगाव दाभाडे : सध्या अनेक वाहन धारकांमुळे एलईडी हेडलाइट्स वापरण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. अनेक वाहन चालक नियमबाह्य पणे अधिक तेजस्वी प्रकाश देणारे एल ई डी हेडलाइट्स बसवत आहेत त्यामुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दीपत असल्याने अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या प्रखर हेडलाईट्समुळे दुचाकी. चारचाकी व पादचारी नागरिकांना देखील त्रास होत आहे.

अनेक जण अधिक तीव्र प्रकाशाचे एल ई डी हेडलाईट बसवत आहे विशेषतः कार, जीप यांना उच्च क्षमतेचे एलईडी दिवे लावले जातात हे दिवे इतके तेजस्वी असतात की समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे पायी चालणाऱ्या नागरिकांना डोळे मिटावे लागतात किंवा थांबावे लागते त्यामुळे वाहनाचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. तळेगाव शहर परिसरात अनेक वाहनांना एलईडी दिवे लावल्याने अपघात झाले आहेत.

वाहन उत्पादक कंपन्या हेडलाईट विशिष्ट निकषानुसार तयार करतात आणि त्यांना संबंधित विभागाची परवानगी प्राप्त असते मात्र बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या डेकोरेटिव्ह एलईडी हेडलाईट माध्यमातून अनेक वाहन चालक नियमाचे सरळ सरळ उल्लंघन करतात. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रगती रूकारी म्हणाल्या की परिवहन विभागाच्या मानका नुसार वाहन उत्पादक कंपन्या हेडलाइट्स तयार करतात.त्या विविध चाचण्या पार केल्यानंतरच बाजारात वापरण्यास मंजुरी देतात परंतु बाजारात मिळणारे एलईडी दिवे कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय विना चाचणी वापरले जात आहे.

हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे नियमबाह्य लाईटचा वापर करणारी वाहने मावळ तालुक्यासह सर्वत्र रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत आहे त्यावर कारवाई होत नसल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाने बेकायदेशीर एलईडी हेडलाईटची विक्री व वाहनावर बेकायदेशीर एलईडी बसवणे यावर बंदी घालावी तसेच वाहने थांबवुन नियमित तपासणी करून दोषी वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी अनेक नागरिकांकडून होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!