Homeक्राईमनिवडणूक नाकाबंदीत देशी दारूचा साठा जप्त.नवलाख उंब्रेत कारवाई

निवडणूक नाकाबंदीत देशी दारूचा साठा जप्त.नवलाख उंब्रेत कारवाई

निवडणूक नाकाबंदीत देशी दारूचा साठा जप्त.नवलाख उंब्रेत कारवाई

नवलाख उंब्रे(मावळ) मावळ तालुक्यात सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नाकाबंदी आणि तपासणी मोहिमेला वेग आला असतानाच, बेकायदेशीर देशी दारू वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. २९ जानेवारी) मावळातील नवलाख उंब्रे परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा पकडला. या प्रकरणी अंतु रामदास शेटे (वय ४०, रा. नवलाख उंब्रे) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक काळात होणाऱ्या अवैध व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने परिसरात विशेष नाकाबंदी उभारली होती. याच नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. प्राथमिक चौकशीत हा साठा विक्रीच्या उद्देशाने आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईसंदर्भात सध्या निवडणूक कर्तव्यावर असलेले अजिंक्य सुनिल म्हेत्रे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून वाहनासह सुमारे सात लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात देशी दारूचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन यांचा समावेश आहे.

निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने होणाऱ्या अशा अवैध व्यवहारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून, या मागे आणखी कोणते साखळी-सूत्र आहे का, याचा शोध घेतला जात आहे. निवडणूक काळात प्रशासनाची ही दारूबंदीची धडक पुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!