Homeमहत्त्वाचेपावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा व चिखलमय रस्त्याची डागडुजीकरण करा. मावळ...

पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा व चिखलमय रस्त्याची डागडुजीकरण करा. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सरकारकडे मागणी

वडगांव मावळ : मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमूग, बाजरी आणि बागायती भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता- तोंडाशी बाजरीचे पीक आले असताना देखील काढता येत नाही, त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागत आहे. तसेच भुईमूग पीकाला पावसामुळे शेतात वापसा नसल्यामुळे काढता येत नाही. काही ठिकाणी शेंगांना मोड येऊ लागले आहेत.

खरीप भात पिकाच्या तयारीच्या कामाला खीळ बसली असून शेतकऱ्यांसमोर भात रोपे कशी तयार करायची याबाबत चिंता लागून राहिली आहे. पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे, तरी त्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.

तसेच खरीप पेरणीसाठी बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, बोगस बियाणांची विक्री होऊ नये यासाठी ताबडतोब उपाययोजना करावी.

त्याचप्रमाणे वडेश्वर ते शिंदे घाटेवाडी पर्यंत रस्ता हा संपूर्ण चिखलमय झाला आहे व तालुक्यातील ग्रामीण भागातील इतर रस्ते देखील खराब झाले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना देखील मोठी कसरत करावी लागते यासंबधी संबंधितांना डागडुजीकरण करण्यास ताबडतोब आदेश द्यावेत. अशा आशयाचे निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.

याप्रसंगी मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुकाध्यक्ष जयश्री पवार, मा.सरपंच कैलास खांडभोर, मा.ग्रा. पं. सदस्य सोमनाथ धोंगडे, ज्येष्ठ नेते बारकूभाऊ ढोरे, दत्तात्रय आंद्रे, सुरज पुरी, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!