Homeसामाजिकप्रतिशिर्डी साई संस्थांचे संस्थापक, शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

प्रतिशिर्डी साई संस्थांचे संस्थापक, शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

प्रतिशिर्डी साई संस्थांचे संस्थापक, शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

शिरगाव – शिवसेनेचे निष्ठावान, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले आणि प्रतिशिर्डी साई संस्थेचे संस्थापक, माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे (वय ७७) यांचे मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकारण, सामाजिक कार्य, शिक्षण व कला क्षेत्राने एक आधारवड गमावला आहे.

त्यांच्यावर २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रकाश देवळे यांचे मूळ गाव पुणे असून त्यांनी आपले शिक्षण १२वी पर्यंत पूर्ण केले. साधे, सरळ पण ठाम व्यक्तिमत्त्व असलेल्या देवळे यांनी आपल्या कामाने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.

२००१ साली शिरगाव येथे त्यांनी प्रतिशिर्डी साई मंदिर उभे करून भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र निर्माण केले. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या कलायात्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. हे त्यांच्या सामाजिक भानाचे उत्तम उदाहरण मानले जाते. अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा ‘समाज भूषण पुरस्कार’ प्राप्त झाला होता.

१९९६ मध्ये विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली. ते शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख राहिले असून, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्ती व विश्वासू सहकारी होते.

देवळे हे फक्त राजकारणीच नव्हे, तर बांधकाम व्यावसायिक, ऑर्केस्ट्राकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. मराठी चित्रपट ‘मायेची सावली’ निर्मिती, दिग्दर्शन व संगीतकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.

त्यांच्या निधनाने पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे यांच्यासह संपूर्ण समाज एका आधारवडाला मुकला आहे. त्यांच्या साधेपणामुळे, लोकसंग्रहामुळे आणि सतत लोकांसाठी उपलब्ध राहणाऱ्या स्वभावामुळे त्यांना सर्व स्तरातील लोकांनी अपार प्रेम दिले.

प्रकाश देवळे यांच्या निधनाने राजकारण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ भरून निघणार नाही, असे सर्वत्र व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!