Homeसामाजिकप्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या उपक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा मावळ केसरी...

प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या उपक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा मावळ केसरी कुस्ती स्पर्धेला अधिकृत मान्यता

मावळ तालुक्यातील कुस्ती परंपरेला नवे बळ देण्यासाठी प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे आयोजित “मावळ केसरी कुस्ती स्पर्धा” कार्यक्रमाला मावळ तालुका कुस्तीगीर संघाने अधिकृत मान्यता प्रदान केली. या मान्यता पत्र वितरण सोहळ्यास कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून स्पर्धेला उत्साहपूर्ण शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी ऑलिंपिक वीर मारुती अण्णा आडकडर महाराष्ट्र चॅम्पियन संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खंडू भाऊ वाळुंज, कार्याध्यक्ष नागेश भाऊ राक्षे, महाराष्ट्र चॅम्पियन्स तानाजी भाऊ कारके, तानाजी भाऊ काळोखे आणि राकेश भाऊ सोरटे , तसेच संघाचे सचिव बंडू भाऊ येवले, स-सचिव पप्पू भाऊ कालेकर, कामगार केसरी दीपक भाऊ दाभाडे, सरपंच शंकर भाऊ देशमुख, तंटामुक्ती समिती अध्यक्ष धोंडिबा भाऊ आडकर आणि सरपंच भगवान लगड आदी मान्यवर उपस्थित होते.

या वर्षी विविध वजनगटांमध्ये कुस्ती स्पर्धांचे आकर्षक आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती मेघाताई भागवत यांनी दिली यामध्ये

१४ वर्षाखालील गटासाठी २२ ते ४२ किलो, १७ वर्षाखालील गटासाठी ४२ ते ७० किलो, तर वरिष्ठ गटासाठी ५७ ते १२५ किलो वजन गट निश्चित करण्यात आले आहेत.

याशिवाय महिलांसाठीही स्वतंत्र वजन गट ठेवून २५ ते ३० किलो, ३१ ते ३५ किलो, ३६ ते ४५ किलो, ४५ ते ५० किलो आणि ५० किलोपेक्षा पुढील वजन गटात स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे महिला कुस्तीगिरांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

ही भव्य स्पर्धा श्रीराम विद्यालयासमोर, नवलाख उंब्रे (मावळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. मावळ येथील होतकरू कुस्तीगीरांसाठी ही एक मोठी संधी असून मान्यवरांच्या उपस्थितीने व संघाच्या अधिकृत मान्यतेने स्पर्धेची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.

मावळच्या मातीतील कुस्ती परंपरा जपण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी ही स्पर्धा मोलाची ठरणार आहे, अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!