Homeमहत्त्वाचेबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम कुंडमळा येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दोरखंड बांधण्यात आले

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम कुंडमळा येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दोरखंड बांधण्यात आले

शेलारवाडी : दरवर्षी पावसाळ्यात इंद्रायणी नदीला मोठा पूर येत असल्याने काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे कुंडमळा येथे अनेक दुर्घटना घडत असतात या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या कुंडमळा शाखेच्या वतीने कुंडमळा येथे पर्यटकांच्या सुरक्षेतेसाठी दोरखंड बांधून पर्यटकांसाठी सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

या उपक्रमासाठी बजरंग दलाचे कुंडमळा शाखेचे कार्यकर्ते सागर भेगडे, मुन्ना आरसुळे, संघपाल लबडे, गौरव भेगडे, अजय राठोड, वेदांत घोगरे व नितेश इंगळे या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी बजरंग दलाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.

अशा प्रयत्नामुळे येथे होणाऱ्या अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कुंडमळा येथे दरवर्षी रांजणखळगे पाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. पाण्याचा अंदाज न आल्याने गोंधळून वाहून जातात अशा दुर्घटनेमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.

या घटना टाळण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन संभाव्य धोकादायक भागात दोरखंड बांधले तसेच धोक्याचा इशारा देणारे फलक देखील लावून पर्यटकांना जागरूक करण्याचे कार्य करण्यात आले आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!