Homeमहत्त्वाचेभात कापणीदरम्यान शेतात १२फूट अजगराचा थरार — वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेने सुरक्षित सुटका

भात कापणीदरम्यान शेतात १२फूट अजगराचा थरार — वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेने सुरक्षित सुटका

कुसगाव खुर्द (ता. मावळ) : कुसगाव खुर्द येथे भात कापणी सुरू असताना शेतात तब्बल १२ फूट लांबीचा अजगर आढळून आला. योगेश शांताराम लालगुडे हे आपल्या शेतात भात कापणीचे काम करत असताना हा प्रसंग घडला.

भात कापणी सुरू असताना त्यांच्या समोर वेटोळे घालून बसलेला मोठा अजगर दिसल्याने त्यांनी तत्काळ काम थांबवून वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्याशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच अनिल आंद्रे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केल्यावर तो साप ‘इंडियन रॉक पायथन’ या जातीचा असून अंदाजे १२ फूट लांबीचा असल्याचे निदर्शनास आले.

आंद्रे यांनी योग्य पद्धतीने अजगराला पकडून त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले, अशी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली.

या बचाव मोहिमेत संस्थेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वन्यजीवांविषयी जागरूकता दाखवत दिलेली तत्पर माहिती व वन्यजीव रक्षकांची जलद कारवाई यामुळे एक मोठा अपघात टळला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!