Homeमहत्त्वाचेभूमाता शेतकरी कृती समितीची मागणी.उर्से च्या जुन्या टोलनाक्यावर एसटी बस थांबा करावा

भूमाता शेतकरी कृती समितीची मागणी.उर्से च्या जुन्या टोलनाक्यावर एसटी बस थांबा करावा

उर्से : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से येथील जुन्या टोलनाक्याच्या जागेवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस थांबण्यासाठी अधिकृत थांबा मंजूर करावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह संबंधित विभागांना भूमाता शेतकरी कृती समितीने निवेदन पाठविले आहे.

शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी यासंदर्भात सांगितले की द्रुतगती महामार्गावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये व दुसऱ्या राज्यातील बस देखील ये -जा करतात. ही प्रवासी वाहतूक करत असताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबण्यासाठी महामंडळाचा अधिकृत बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांना समस्या निर्माण होत आहेत.

उर्से टोल नाक्यावर अधिकृत बस थांबा करावा अशी मागणी शेतकरी कृती समितीसह अनेक नागरिकांनी केली आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थ. शेतकरी. ज्येष्ठ नागरिक. मावळ तालुका प्रवासी संघाने पुढील मागण्या देखील केल्या आहेत(१) द्रुतगती महामार्गावरील जुन्या उर्से टोलनाक्यावर अधिकृत बस थांबा मंजूर करावा.(२)उर्से टोल नाक्यावर होणारा अधिकृत बस थांबा मुंबई व पुण्याच्या दिशेच्या दोन्ही बाजूने व्हावा.(३) पाणी वीज शौचालय सुरक्षा कर्मचारी आदी सुविधा कराव्यात.(४)उर्से टोल नाका.उर्से खिंड ते वडगाव फाट्यापर्यंत रस्ते विकास महामंडळ व संबंधित विभागाने रस्त्याच्या कडेने प्रवाशांच्या व वाहन चालकांच्या सुरक्षेतेसाठी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!