निधन वार्ता
तळेगाव दाभाडे: माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव धोंडीबा भेगडे( वय ८९ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा अनेक क्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव होता. भारतीय जनसंघ या राजकीय पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्तीची सुरुवात केली.
दोन वेळा ते मावळ मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात कन्या, जावई, दोन बहिणी, पुतणे, भाचे, नातवंडे असा परिवार असून त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दिनांक १जुलै २०२५ रोजी सकाळी ११: वाजता पुणे मुंबई महामार्ग लगत असणाऱ्या लेख पॅराडाईज येथील राहत्या घरापासून निघेल. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईल.



















