Homeसामाजिकमाजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्री...

माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे घेतले दर्शन

माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे घेतले दर्शन

तळेगाव दाभाडे : शहरातील विविध गणेश मंडळांना माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी शनिवार, रविवार व सोमवारी सायंकाळी भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले व आरती केली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांनी गणेश मंडळांच्या आकर्षक सजावटीचे व सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले.

गणेश चतुर्थीच्या आगमनानंतर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. तरीदेखील चतुर्थीच्या चार दिवस आधीच मंडळांनी सजावटीचे काम पूर्ण केले होते. मंडळांच्या भेटीदरम्यान बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.

भेट दिलेली मंडळे –

श्री डोळसनाथ महाराज गणेश मंडळ, शेतकरी तरुण मंडळ, कान्होबा मित्र मंडळ, राजा शिवछत्रपती तरुण मंडळ, भेगडे तालीम तरुण मंडळ, कैकाडी समाज तरुण मंडळ, श्री गणेश तरुण मंडळ, शाळा चौक तरुण मंडळ, राजेंद्र चौक तरुण मंडळ, आझाद मित्र मंडळ, जिजामाता मित्र मंडळ, मारुती मंदिर चौक मित्र मंडळ, फ्रेंड्स क्लब मित्र मंडळ, शिवभक्त तरुण मंडळ आदी प्रमुख मंडळांना त्यांनी भेटी दिल्या.

यावेळी सर्व गणेश मंडळांनी बाळा भेगडे यांचा तसेच सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सत्कार केला. शहरात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने व ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

भेटींच्या कार्यक्रमात भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, माजी शहराध्यक्ष रवींद्र बाळासाहेब माने, चिराग खांडगे, शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील), माजी नगरसेविका संध्या गणेश भेगडे, माजी नगरसेवक अमोल जगन्नाथ शेटे, युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष केदार गोरख भेगडे, माजी शहराध्यक्ष गणेश आप्पा भेगडे, भेगडे तालीम मंडळाचे अध्यक्ष समीर शंकरराव भेगडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!