Homeसामाजिकमानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने भंडारा...

मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने भंडारा डोंगर चढणे( रनिंग) स्पर्धेचे आयोजन

तळेगाव दाभाडे : मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने भंडारा डोंगर चढणे( रनिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले.

तळेगाव शहरातील अग्रगण्य पतसंस्था हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने पतसंस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि २७ जून ते २९ जून २०२५ पर्यंत वृक्षारोपण व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता भंडारा डोंगर चढणे( रनिंग) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी मुले-मुली. इयत्ता आठवी ते दहावी मुले -मुली. खुला गट महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा भंडारा डोंगर पायथा येथून सुरू होणार आहे.

स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार असून प्रत्येक गटात प्रथम. द्वितीय. तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातील. इयत्ता पाचवी व दहावीच्या स्पर्धकांनी आपल्या पालकांबरोबर किंवा शाळेच्या शिक्षकांबरोबर स्पर्धेच्या ठिकाणी यावे. सहभागी प्रत्येक स्पर्धकांना प्रशस्तीपत्र तसेच विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी होईल.

या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध आर्यन मॅन निलेश तरवडे व रोटरी क्लबचे गव्हर्नर दीपक फल्ले यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता खेळाडूस २०००रूपये. द्वितीय क्रमांक विजेता खेळाडूस १५००रूपये. तृतीय क्रमांक खेळाडूस ७५० रुपये. व उत्तेजनार्थ खेळाडूस ५०० रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक २८ जून २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता पतसंस्था कार्यालय तळेगाव चाकण रोड येथे नाव नोंदणी करावी.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच शुक्रवार दिनांक २७जून २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता इंद्रायणी महाविद्यालय परिसरात देवराई संस्था मावळ यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे. अधिक माहिती करिता 880587858. 8308664609. 9604788818. 99211688928. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!