Homeउद्योगमावळच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत’ नावाला...

मावळच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत’ नावाला अधिकृत मान्यता

मावळच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत’ नावाला अधिकृत मान्यता

मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देणारी इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत आता ‘कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, मावळ’ या नव्या नावाने ओळखली जाणार आहे. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार, मावळभूषण माजी आमदार स्व. कृष्णरावजी भेगडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आकाराला आलेल्या या वसाहतीच्या नामकरणास सहकार विभागाने अधिकृत मंजुरी देत कागदोपत्री शिक्कामोर्तब केले आहे.

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसरात वसलेली ही सहकारी औद्योगिक वसाहत उद्योजकांसाठी विकासाचा आधारस्तंभ ठरत आहे. लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना एकत्र आणत उद्योजकांना जागा, पाणीपुरवठा, वीज तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे. सध्या वसाहतीमध्ये एकूण १९ कारखाने कार्यरत असून येत्या काळात अनेक नवीन उद्योग येथे दाखल होणार आहेत. यामुळे मावळ परिसरात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेच्या ११व्या वर्षातील दुसऱ्या दिवशी, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी नामफलकाचे प्रातिनिधीक अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती व कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुणजी फिरोदिया, मालपाणी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मा. संजयजी मालपाणी तसेच संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या भव्य कमानीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी दिली. सध्या अध्यक्षपदाची जबाबदारी नंदकुमार शेलार सांभाळत असून कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश खांडगे.राजश्री म्हस्के .सचिन ढोरे.अरूण वाघमारे हे कार्यरत आहेत.

या नामकरणासंदर्भात तसेच संस्थेच्या भावी विकास योजनांची माहिती देण्यासाठी दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वडगाव मावळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेश गाडे(पाटील). प्राध्यापक सत्यजित खांडगे . बाळासाहेब गाडे (पाटील ). हर्षवर्धन शिंदे.आदी उपस्थित होते. मावळच्या औद्योगिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी ही वसाहत भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!