Homeमहत्त्वाचेमावळात छत्रपती संभाजी महाराज चरित्र जागर ’ स्पर्धेची घोषणा. तरुणांमध्ये इतिहास जागवण्यासाठी...

मावळात छत्रपती संभाजी महाराज चरित्र जागर ’ स्पर्धेची घोषणा. तरुणांमध्ये इतिहास जागवण्यासाठी ऑनलाइन उपक्रम. २३ मार्चला विजेत्यांची घोषणा

मावळात छत्रपती संभाजी महाराज चरित्र जागर ’ स्पर्धेची घोषणा. तरुणांमध्ये इतिहास जागवण्यासाठी ऑनलाइन उपक्रम. २३ मार्चला विजेत्यांची घोषणा

मावळ : छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता आणि प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत तसेच जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मावळ तालुक्यात ‘छत्रपती संभाजी महाराज चरित्र जागर स्पर्धा’ या अनोख्या ऑनलाइन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत शिवभक्तांनी यूट्यूबवरील ३० भागांची शंभूचरित्र मालिका पाहून त्यावर अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया नोंदवायची आहे. विजेत्यांची घोषणा दिनांक २३ मार्च २०२६ रोजी YouTube Live द्वारे करण्यात येणार आहे.

स्पर्धेतून प्रत्येकी रु. ५००१ अशी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या शिवभक्तांची निवड परीक्षक मंडळाकडून सखोल विश्लेषण करून केली जाईल. निवड झालेल्या विजेत्यांना रोख रक्कम ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धेचा मुख्य उद्देश छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा जागर समाजात करणे हा आहे. इतिहासातील अनेक गैरसमज दूर करून अभ्यासपूर्ण आणि संदर्भाधारित माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://youtube.com/playlist?list=PLzy3Eqpd13P5Zywv-ACB4nxq5s0711x9f&si=Zg_qyR3Ug3h9mu_w या लिंकवरील ‘जागर शंभूचरित्राचा’ या मालिकेतील सर्व ३० भाग पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या संबंधित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये छत्रपती शंभूराजांविषयी समजलेली माहिती लिहायची आहे. अधिकाधिक शब्दांत, चुकांची दुरुस्ती करणाऱ्या आणि शंभूचरित्रात भर घालणाऱ्या अभ्यासपूर्ण कमेंट्सना प्राधान्य दिले जाणार आहे.

विजेते ठरवताना सर्व ३० भाग ऐकून त्यावर कमेंट केलेल्या शिवशंभू भक्तांचाच विचार केला जाईल. जगभरातून कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या सहभागांची दखल घेतली जाणार नाही.

ज्या शिवभक्तांनी सर्व ३० भाग ऐकून कमेंट नोंदविल्या आहेत, त्यांनी २० मार्च २०२६ रोजी ९२७०२१२३१२ या क्रमांकावर आपले पूर्ण नाव व व्हॉट्सअॅप संपर्क क्रमांक पाठवणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रमोद बोराडे (इतिहास अभ्यासक व संशोधक), श्री. पुरुषोत्तम चव्हाण (इतिहास अभ्यासक), अॅड. विनय दाभाडे (शिवव्याख्याते व संस्थापक, शिवसह्याद्री महानाट्य) आणि दुर्गसेवक सचिनभाऊ शेडगे (कार्याध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान) हे मान्यवर कार्य पाहणार आहेत.

या उपक्रमामागील प्रामाणिक हेतू छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा प्रसार आणि जागर करणे हा असल्याचे आयोजक डॉ. प्रविण रामभाऊ माने (तळेगाव दाभाडे, पुणे) यांनी स्पष्ट केले. “माझ्या लिखाणात, अभ्यासात किंवा व्हिडिओमधील माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास अभ्यासकांनी वैयक्तिक संपर्क साधावा. योग्य मार्गदर्शन आम्हाला मोलाचे ठरेल, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. प्रविण माने यांनी शंभूशौर्यगाथा लिहिताना वा. सी. बेंद्रे लिखित छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. सौ. कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी या समकालीन साधनांवर आधारित संदर्भग्रंथांचा अभ्यास केल्याचे नमूद केले. ही स्पर्धा वादविवाद विरहित आणि अभ्यासपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!