Homeमहत्त्वाचेमावळात पुन्हा एकदा अजगराचा विस्मय! शेतात १४ फुटी इंडियन रॉक पायथनची उपस्थिती

मावळात पुन्हा एकदा अजगराचा विस्मय! शेतात १४ फुटी इंडियन रॉक पायथनची उपस्थिती

मावळात पुन्हा एकदा अजगराचा विस्मय! शेतात १४ फुटी इंडियन रॉक पायथनची उपस्थिती

पवना नगर: मावळ परिसर पुन्हा एकदा वन्यजीव प्रेमींनी दचकावा अशी घटना पाहिली आहे. महागाव शिवारातील शेतात भात कापणी करत असताना तब्बल १४ फुटांचा इंडियन रॉक पायथन (अजगर) शेतकऱ्यांच्या नजरेस आला.

ही घटना आज १० नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. शेतकरी कुंडलिक पडवळ हे आपल्या शेतात भात कापणीचे काम करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या नजरेस भाताच्या पुंजक्यात हालचाल दिसली. जवळ जाऊन पाहिले असता मोठा अजगर वेटोळं घालून बसलेला दिसला. त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच संस्थेचे सदस्य रमेश कुंभार आणि अभिनव पडवळ हे घटनास्थळी दाखल झाले. साप पाहताच त्यांनी ओळख पटवली की तो इंडियन रॉक पायथन या संरक्षित प्रजातीतील अजगर आहे. दोघांनी दक्षतेने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला सुरक्षितपणे पकडले.

यानंतर त्यांनी संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे आणि अध्यक्ष अनिल यशवंत आंद्रे यांना माहिती दिली. तसंच वन विभागालाही घटनेची त्वरित माहिती देण्यात आली. अनिल आंद्रे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन अजगराची प्राथमिक तपासणी केली असता तो पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्या अजगराला पुन्हा सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी वन्यजीव रक्षकांच्या तत्पर कारवाईमुळे कोणतीही हानी झाली नाही. संस्थेच्या या कार्याचे स्थानिक ग्रामस्थांनी कौतुक केले. गेल्या पंधरा दिवसात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून ३अजगराना जिवदान देण्यात आले असुन महिन्याभरात ५०विषारी घोणस सापाना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!