Homeसामाजिकमावळ गर्जना प्रतिष्ठानची यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान भांगरवाडी गोविंदा पथक लोणावळा यांनी...

मावळ गर्जना प्रतिष्ठानची यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान भांगरवाडी गोविंदा पथक लोणावळा यांनी पटकावला.

वडगांव मावळ : मावळ गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळ चे वतीने दरवर्षीप्रमाणे शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत. वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या भव्य प्रांगणात रुपये – ७,७७,७७७/- रोख बक्षिस तसेच बाल कलाकारांचे विविध नृत्याविष्कारासह सोहळा संपन्न झाला.

मुंबई, पनवेल, लोणावळा, येथील गोविंदा पथकांचे नियोजनबद्ध, हर्षोल्हासात आणि जोशपूर्ण वातावरणात पाच/सहा/सात – थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली. वडगाव आणि मावळ परिसरातील हजारो नागरिक बंधू भगिनी, बाळ गोपाळ हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान भांगरवाडी गोविंदा पथक लोणावळा यांनी पटकावला.

प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे, आणि हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रात्री- १०:०० वाजता दहीहंडी फोडण्यात आली, आणि एकच जल्लोष झाला.जय भवानी जय शिवाजी ! गोविंदा रे गोपाळा ! गणपती बाप्पा मोरया! या जयघोषणांनी आसमंत निनादला.

दहीहंडी पूजन करून दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे गुलाबराव म्हाळसकर, संभाजी म्हाळसकर, प्रभाकर वाघमारे, अतुल राऊत, विशाल वहिले, सुनील शिंदे, बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आणि रुपेश म्हाळसकर (मा.अध्यक्ष मनसे मावळ) यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध संपन्न होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यास भेट देण्यासाठी वडगाव तसेच मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी भेट दिली.त्यामध्ये गणेश काकडे, किरण म्हाळसकर, राहुल ढोर, चंद्रजीत वाघमारे, राजेंद्र कुडे, गणेश विनोदे, प्रसाद पगळे, रोहीत लांघे, आशिष खांडगे, अजय भवार, नितीन कुडे, अनिल ओव्हाळ,

माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या सह सायली बोत्रे, सीमा आहेर, पूजा पडवळ, अनुराधा शिंकारे, मीनाद गुप्ता, रेखा भेगडे, सुनंदा म्हाळसकर, पूजा वहिले, माया चव्हाण, पूनम जाधव, कल्पना पगडे, ज्योती चव्हाण, अश्वीनी म्हाळसकर, रुपाली क्षीरसागर उपस्थित होत्या.

वडगाव शहरातील जेष्ठ नागरीक संघानेही या सोहळ्यास उपस्थित राहून सक्रीय सहभाग नोंदवला. उपस्थित सर्वांचे स्वागत सायली म्हाळस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन तानाजी तोडकर यांनी केले

हा दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरज भेगडे, सुरेश जाधव, संतोष म्हाळस्कर, मच्छिंद्र मोहीते, सागर शेलार, विकास साबळे, प्रणव म्हाळस्कर, अनिल नायर, गणेश भांगरे, ओंकार भांगरे, शुभम म्हाळस्कर, गणेश मालपोटे, जयंत कुंभार, नवनाथ शिवेकर, महेंद्र शिंदे, रोहीत कोळी, संग्राम भानुसघरे यांनी विशेष परिश्रम घेतले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!