Homeसामाजिकमावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष पदी पोपटराव भेगडे यांची नियुक्ती

मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष पदी पोपटराव भेगडे यांची नियुक्ती

मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष पदी पोपटराव भेगडे यांची नियुक्ती

तळेगाव दाभाडे : रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन, निवेदन व रचनात्मक पाठपुरावा करून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाची मासिक सभा नुकतीच तळेगाव दाभाडे येथील कालिका माता मंदिरात उत्साहात पार पडली. या सभेत संघाची पुढील तीन वर्षांसाठीची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. संघाचे विद्यमान पदाधिकारी, मावळ परिसरातील अनेक रेल्वे प्रवासी तसेच नवनिर्वाचित प्रतिनिधी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी संघाचे सचिव विष्णुपंत गजरे (पाटील) यांनी गेल्या काही वर्षांत झालेल्या कार्यांचा आढावा घेतला. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुधारणा, स्टेशनवरील सुविधा वाढ, तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता, तसेच स्थानक परिसर स्वच्छता या विषयांवर संघाने केलेल्या कामगिरीचे त्यांनी विशेष उल्लेख केले.

यानंतर पुढील तीन वर्षांसाठीची कार्यकारिणी सर्वानुमते निश्चित करण्यात आली. संघटनेच्या कार्यात सातत्य आणि गतिमानता राखत रेल्वे प्रशासनासोबत संवाद साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नव्या कार्यकारिणीकडून सांगण्यात आले.

निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे .

अध्यक्ष: पोपटराव गणपतराव भेगडे

कार्याध्यक्ष: सचिन सुनील जोशी

उपाध्यक्ष: दिपालीताई दामोदर गोकर्ण, मोहन महादेव डंबे

सचिव: विष्णुपंत हनुमंत गजरे (पाटील)

सहसचिव: महादेव लक्ष्मण धामणकर

खजिनदार: विजय बाबुराव पंडित

सहखजिनदार: नवनाथ मारुती कुल

सदस्य: अरविंद श्रीराम मुरकुटे, सुरेश गजानन भारद्वाज, दिलीप शंकरराव चौधरी, सुभाष वाळुंज, सुरेश काशिनाथ भोईर, प्रभाकर श्रीराम मुरकुटे, अशोक भिमाजी भेगडे

नव्या पदाधिकाऱ्यांचा सर्व उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी बोलताना नव्याने निवडलेले अध्यक्ष पोपटराव भेगडे यांनी सांगितले की, “संघ नेहमीच प्रवाशांच्या अडचणींना प्राधान्य देत आला आहे. पुढील काळात तळेगाव, घोरावाडी., बेगडेवाडी.वडगाव.कामशेत.कान्हे.मळवली.लोनावळा.या मार्गावरील प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संवाद साधला जाईल.”

कार्याध्यक्ष सचिन जोशी यांनी म्हटले की, रेल्वे प्रवाशांच्या अडचणींवर केवळ चर्चा न करता ठोस कृती करण्याचा संघाचा प्रयत्न राहील. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या प्रवासाच्या वेळा, महिलांसाठी आरक्षित डब्यांची वाढ, आणि स्थानकांवरील मूलभूत सुविधा यावर संघाचा भर असेल.

सभेच्या शेवटी माजी पदाधिकारी व उपस्थित सदस्यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत, संघाचे कार्य आणखी प्रभावीपणे पार पडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाने गेल्या काही वर्षांत स्थानिक लोकांच्या प्रवासाशी संबंधित अनेक समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला आहे. रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे नव्या कार्यकारिणीकडूनही प्रवाशांच्या हितासाठी ठोस आणि दूरदर्शी योजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!