Homeमहत्त्वाचेमावळ – नवलाख उंब्रे येथे मावळ केसरी कुस्ती स्पर्धेत इतिहास; राहुल सातकर...

मावळ – नवलाख उंब्रे येथे मावळ केसरी कुस्ती स्पर्धेत इतिहास; राहुल सातकर मावळ केसरी, महिलांमध्ये अनुष्का दहिभाते, कुमार केसरी ओंकार भोते

मावळ – नवलाख उंब्रे येथे मावळ केसरी कुस्ती स्पर्धेत इतिहास; राहुल सातकर मावळ केसरी, महिलांमध्ये अनुष्का दहिभाते, कुमार केसरी ओंकार भोते

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेली मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मावळच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. प्रशांत दादा भागवत युवा मंच व मेघाताई भागवत यांच्या विद्यमाने पार पडलेली ही स्पर्धा अत्यंत भव्य, दिमाखदार व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सौजन्याने आयोजित या स्पर्धेत तब्बल १२५ नामवंत कुस्तीगिरांनी सहभाग घेतला.

पुरुष गटात पै. राहुल सत्यवान सातकर (कान्हे) याने दमदार व तांत्रिक खेळाचे प्रदर्शन करत मावळ केसरी किताबावर आपले नाव कोरले. विजेत्या राहुल सातकरला आयोजकांच्या वतीने बुलेट मोटरसायकल, मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

महिलांच्या गटात पै. अनुष्का शाहिदास दहिभाते (बेडसे) हिने उत्कृष्ट कामगिरी करत महिला मावळ केसरीचा मान पटकावला. तिला स्कूटर, मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली.

कुमार गटात पै. ओंकार शामराव भोते (परंदवडी) याने प्रभावी खेळ करत कुमार केसरी किताब जिंकला असून त्याला हिरो होंडा मोटरसायकल देण्यात आली.

या स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मावळ तालुक्यात प्रथमच महिलांना मावळ केसरी कुस्ती स्पर्धेत विशेष व सन्मानाचे स्थान देण्यात आले. मावळ केसरी किताबाच्या मानकरी पैलवानाला स्व. सचिन शेळके यांच्या स्मरणार्थ सुनील शेळके यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली.

या वेळी आमदार सुनील शेळके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय भाऊ चौधरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. विलास सर कथुरे, तालुका अध्यक्ष गणेश शेठ खांडगे व महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्पर्धेदरम्यान झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पै. मारुती आण्णा वाघुजी आडकर यांना जीवनगौरव पुरस्कार, पै. चंद्रकांत नाना दाभाडे यांना मावळभूषण पुरस्कार, तर पै. भरत दशरथ लिम्हण यांना मावळ कुस्ती महर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनीही आवर्जून उपस्थिती दर्शविली. नवलाख उंब्रे ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हा सोहळा अधिक भव्य ठरला. पैलवानांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, कपडे बदलण्याची सुविधा, स्वच्छ व पौष्टिक भोजन व्यवस्था तसेच सर्व स्पर्धकांना ड्रायफ्रूट किटचे वाटप असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला, ज्याची परिसरात विशेष चर्चा झाली.

कुस्ती म्हणजे केवळ ताकदीचा खेळ नसून शक्ती, शिस्त, संयम व स्फूर्ती यांचा अद्वितीय संगम असल्याचे या स्पर्धेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पारंपरिक खेळांना आधुनिक स्वरूप देत तरुण पिढीला कुस्तीच्या मैदानाकडे आकर्षित करणारी ही स्पर्धा मावळच्या क्रीडा परंपरेसाठी नवा मानदंड ठरली असून, प्रशांत दादा भागवत युवा मंच व मेघाताई भागवत यांच्या आयोजनामुळे मावळ केसरी पुरस्काराचे महत्त्व अधिक दृढ झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!