Homeमहत्त्वाचेमावळ मधील वाकसई येथे मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न

मावळ मधील वाकसई येथे मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न

लोनावळा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लढ्याचा एल्गार करत मराठा समाज बांधवांनी शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट२०२५ रोजी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील करणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर व ग्रामीण मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक वाकसई येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पादुका स्थान येथे उत्साहात पार पडली.या बैठकीत मोर्चा यशस्वी होण्यासाठी नियोजन, प्रचार आणि मराठा समाजाच्या व्यापक सहभागावर भर देण्यात आला.

विशेषतः मावळ तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यातील प्रमुख केंद्र कान्हे फाटा येथे एकत्रित बैठक होणार असून, त्यासाठी समाजबांधवांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.तसेच एक ऑगस्ट २०२५ रोजी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई एकविरा देवीला अभिषेक करण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

बैठकीत बोलताना काही वक्त्यांनी २९ ऑगस्टचा मोर्चा हा मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक ठरणार असून, राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण टप्पा असेल, असे मत व्यक्त केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!