Homeमहत्त्वाचेयेवलेवाडी गावाला स्मशानभूमीचा प्रश्न कायम चार किलोमीटर वळसा घालून करावे लागतात...

येवलेवाडी गावाला स्मशानभूमीचा प्रश्न कायम चार किलोमीटर वळसा घालून करावे लागतात अंत्यसंस्कार

येवलेवाडी गावाला स्मशानभूमीचा प्रश्न कायम

चार किलोमीटर वळसा घालून करावे लागतात अंत्यसंस्कार

कान्हे : ग्रुप ग्रामपंचायत कान्हेअंतर्गत येवलेवाडी हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीविना आहे. या गंभीर प्रश्नामुळे गावकऱ्यांना आजही मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

गावात मृत्यू झाल्यास मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना तब्बल चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. अनेकदा रस्त्याच्या गैरसोयीमुळे व पाहुण्यांना सोबत नेताना नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. “मरणानंतरही माणसाला मरणयातना भोगाव्या लागतात,” अशी ग्रामस्थांची खंत व्यक्त होते.

जागेच्या अभावामुळे अडचणी

सध्या जेथे अंत्यसंस्कार केले जात आहेत ती जागा वनविभागाच्या क्षेत्रात मोडते. त्यावर जाणारा मार्ग खाजगी जमिनधारकाने बंद केल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गे चार किलोमीटरचा आवळसा घालून जावे लागते.

गावाला कायमस्वरूपी स्मशानभूमी मिळावी यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा असला तरीही कुणी स्वतःची जमीन देण्यास तयार नाही. “स्मशानभूमी लागून आमची शेती किंवा जागा असेल तर किंमत कमी होईल,” या विचारातून ग्रामस्थांमध्ये विरोध होत असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले.

पादंन रस्त्यावरील अडथळे

याशिवाय येवलेवाडी–नायगावला जोडणारा पारंपरिक पादंन रस्ता पूर्वी गावकऱ्यांच्या सोयीचा होता. मात्र आता अतिक्रमणामुळे हा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नायगाव गाठण्यासाठीदेखील नागरिकांना चार किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.

दशक्रियेवेळी पुढाऱ्यांची भाषणे, उपाय मात्र नाही

गावात अंत्यविधी किंवा दशक्रिया विधीच्या वेळी स्थानिक पुढारी उपस्थित राहून भाषणे देतात. मात्र स्मशानभूमीच्या प्रश्नावर ठोस पावले मात्र घेतली जात नाहीत, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांची मागणी

गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ येवले यांनी सांगितले, “येवलेवाडीला कायमस्वरूपी स्मशानभूमीची गरज आहे. सध्या नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते. अनेकदा उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. स्थानिक नेते, ग्रामपंचायत व प्रशासनाने तत्काळ पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा,” अशी मागणी त्यांनी केली.

प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!