Homeसामाजिकराजपुरीत ‘मनोरंजन संध्या 2025’ यशस्वी प्रशांत दादा भागवत यांचे नेतृत्व ठरले...

राजपुरीत ‘मनोरंजन संध्या 2025’ यशस्वी प्रशांत दादा भागवत यांचे नेतृत्व ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू

राजपुरीत ‘मनोरंजन संध्या 2025’ यशस्वी

प्रशांत दादा भागवत यांचे नेतृत्व ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू

राजपुरी : मावळ तालुक्यातील राजपुरी येथे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रेरणेने आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीने “मनोरंजन संध्या 2025” हा भव्य व उत्साहवर्धक कार्यक्रम मोठ्या दणक्यात पार पडला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे संपूर्ण गावात स्नेह, आनंद आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, हास्यविनोद आणि विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलावर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे या संध्याकाळीचा खरा ठेवा महिलांचा उत्साह ठरला.

स्पर्धेचे विजेते

या विशेष संधीत झालेल्या मनोरंजक स्पर्धेत –

प्रथम क्रमांक – प्रियंका संदीप चव्हाण

द्वितीय क्रमांक – प्रियंका जगताप

तृतीय क्रमांक – सानिका आदिनाथ लंके

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास नारायण शिंदे, प्रदीप बनसोडे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, भरत घोजगे, भगवान शिंदे, किसनराव शिंदे, संतोष वंजारी, बाबाजी शिंदे, आदिक शिंदे, छगन लंके, अंकुश वाघमारे, संदीप चव्हाण, मयूर शिंदे, राहुल लोंढे, पूनम सागर शिंदे, प्रिती सोमनाथ लंके, मयूरी पाटोरे, विद्या ठोमसे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिकच भव्य आणि संस्मरणीय झाला.

सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

कार्यक्रमादरम्यान राजपुरी येथील भैरवनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 51 हजार रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

प्रशांत दादांच्या नेतृत्वाची छाप

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे प्रशांत दादा भागवत यांनी मावळातील महिलावर्ग, तरुणाई आणि ग्रामस्थांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. केवळ राजकीय कार्यच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीतही सक्रिय सहभाग घेणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे.

‘मनोरंजनासोबत समाजजागृती’ हा विचार पुढे ठेवून आयोजित हा कार्यक्रम प्रशांत दादांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा ठसा उमटवणारा ठरला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशांत दादा भागवत हेच सक्षम व विश्वसनीय पर्याय असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!